देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बँकेच्या 44 कोटी हून अधिक ग्राहकांना होणार आहे. करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात सर्व सामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना यापुढे खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही. इतक नव्हे तर यापुढे बँक ग्राहकांकडून एसबीआय शुल्क आकारणार नाही. हा नवा नियम बँकेच्या सर्व बचक खाते धारकांना लागू होणार आहे. बँकेने सर्व बचत खात्यांसाठी किमान शुल्क ठेवण्याचा नियम बदलला आहे. यामुळे ग्राहकांनी जर त्यांच्या खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बँकेच्या ज्या बचक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग आणि चेक बुकची सुविधा आहे त्यांचे देखील शुल्क माफ करण्यात आल्याचे डइखने म्हटले आहे. बँकेने यासंदर्भात सोशल मीडियावरील अधिकृत अकांउटवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच बरोबर एसबीआयने अशा काही ग्राहकांसाठी एटीएममधील व्यवहार अमर्यादित केले आहे. जे खातेधारक महिन्याला 1 लाखा पेक्षा अधिक इतकी रक्कम किमान शिल्लक रक्कम ठेवतात त्यांना एटीएमद्वारे केलेल्या व्यवहारांना शुल्क द्यावे लागणार नाही.